Type to search

Featured मार्केट बझ

वाहनउद्योगावर कारोना इफेक्ट

Share
वाहनउद्योगावर कारोना इफेक्ट , Corona Effect Automotive Industry Fitch Solutions

चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 2020 मध्ये देशांतर्गत वाहन निर्मितीत 8.3% घसरण होण्याची शक्यता फिच सोल्यूशन्सने व्यक्त केली आहे. चीनमधील या विषाणू संसर्गामुळे वाहनांचे सुटे भाग बनवणार्‍या कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे भारतासोबत जगभरातील वाहन उद्योगावर परिणाम होत आहे.

जपानमध्ये निसान आणि दक्षिण कोरियात ह्युंदेईलाही वाहनाच्या सुट्या भागाच्या कमतरतेमुळे आपले कारखाने काही दिवस बंदकरावे लागले. फिचने सांगितले की, भारतात कोरोना विषाणू पसरल्यास देशाची आरोग्य प्रणाली पाहता चीनच्या तुलनेत त्यांचा येथे जास्त संसर्ग होईल. देशांतर्गत वाहन उद्योगावर जास्त व्यापक परिणाम पाहायला मिळतील. फिचने सांगितले की, चीन भारतीय वाहन उद्योगासाठी सुट्या भागाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. अशा स्थितीत तयार सांगाड्याच्या कमतरतेमुळे भारतीय वाहन उद्योगाच्या उत्पादनात घट झाल्याने भारतीय वाहन उद्योगाच्या उत्पादनाची गती कमी करणे किंवा बंद करावी लागू शकते.

या कारणांमुळे 2020 मध्ये देशातील वाहन निर्मितीत 8.3% घट होण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये यात 13.2 टक्क्यांची घसरण नोंदली. चीन भारताच्या ऑटो पार्ट्सच्या गरचेच्या 10 ते 30% पुरवठा करतो. इलेक्ट्रिक वाहनात दोन किंवा तीनपट जास्त असतो.

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतासाठी निर्यात वाढण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भारत, आशियात चीनचा प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि त्यांचा चीनसोबत व्यापार तोटाही खूप जास्त आहे. सुब्रमण्यन यांनी कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये म्हटले की, काय होईल हे सांगणे कठीण आहे.
-कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!