Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदेशात 70 टक्के रुग्ण आता बरे

देशात 70 टक्के रुग्ण आता बरे

अखेर करोनावर लस आलीच

नवी दिल्ली

- Advertisement -

गेल्या 2 तासांत देशात 60 हजार 963 नव्या करोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 23 लाख 29 हजार639 इतकी झाली आहे. तसेच 834 रुग्णांनी यामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे करोनाच्या विळख्यातून बाहर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. देशातील 70.38 टक्के रुग्ण आता बरे झाले आहे. आता फक्त 27.64 टक्के रुग्ण आजारी आहे. तसेच 1.98 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एका दिवसात तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या