Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक

पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचं आढळून आलंय. पुण्याचा मृत्यूदर तब्बल 9.18 टक्के असून देशाच्या मृत्यू दराच्या तुलनेत तीन पट जास्त आहे. पुणे मनपाच्या 17 तारखेच्या आकडेवारीत टक्केवारी नमूद करण्यात आली. पुण्याचा मृत्यू दर देशात सर्वाधिक असल्यान संपूर्ण पुणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने रात्रीपासून पुणे शहर सिल करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी शहरात आज सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून संचार बंदीचे आदेश दिलेत. 20 तारखेच्या दोन वाजल्यापासून 27 तारीख रात्री बारा वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिलेत. अत्यावश्यक सेवाची दुकाने काही तासासाठी उघडी राहणार असून, त्यामध्ये ऑनलाइन आणि घरपोच सेवा पुरविण्यार्‍यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

देशाचा मृत्यूदर 3.26 टक्के तर राज्याचा मृत्यु दर 6.05 टक्के आहे. माञ पुण्याचा मृत्युदर तब्बल 9.18 टक्के आहे. मृत्यू दराच्या टक्केवारीत पुण्यानं राज्याला आणि देशालाही मागे टाकले. मात्र ही टक्केवारी चिंता वाढवणारी असल्यानेच संपूर्ण पुणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने रात्रीपासून पुणेशहर सिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी शहरात आज सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून संचार बंदीचे आदेश दिलेत. सतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलीय. जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक घटकांना सवलत देण्यात आली आहे.
त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, दूध, दुग्धजन्य उत्पादन आणि किराणा मालासाठी चार तास सवलत दिलीय. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत दुकान सुरू करण्यास सवलत आहे. तर किराणा फळे जीवनावश्यक वस्तू घरपोच ऑनलाईन देणार्‍या साठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी आहे. तर खाद्यपदार्थ पुरवठा करणार्‍या कंपन्यांसाठी सकाळी दहा ते तीन आणि सायंकाळी सहा ते दहा सवलत आहे.

मात्र कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या दक्षता राबवण्याचे निर्देश दिलेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.पुण्यात संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू, दूध, दुग्धजन्य पदार्थ, किराणामाल, फळे आणि भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. या संदर्भात डिजिटल पासची आवश्यकता नाही. पोलिसांनी दिलेल्या डिजिटल पासधारकांना मनाई आदेश लागू नसतील असंही पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय.
त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू विक्री, दूध, दुग्धजन्य पदार्थ किराणामाल, फळे-भाजीपाला आणि घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल पंप, रेशन दुकान संबंधितांना सवलत आहे. पोलीस, शासनाचे इतर विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीनं परस्परपूरक यंत्रणा निर्माण केलीय.

तर मनाई आदेश पोलीस, संरक्षण दल, आरोग्य विभागला नसेल. त्याचबरोबर हॉस्पिटल, औषधालय, अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, कोरोना संदर्भात पुणे मनपा आणि इतर शासकीय विभाग आणि पोलिसांनी दिलेले डिजिटल पासधारक यांना लागू नसतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

काय आहेत नवीन नियम?
जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला) पुरविणारे केंद्रे दिवसभरात केवळ चार तास म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी
घरपोच किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणेसाठी फ्लिपकार्ड, अमेझॉन तसेच इतर ऑनलाईन सेवा देणार्‍या उद्योगांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामे करता येणार आहेत. त्याच वेळेत त्यांनी सेवा द्यायची आहे.
खाद्यपदार्थ वितरण करण्यासाठी बिग बास्केट, स्वीगी झोमॅटो तसेच इतर ऑनलाइन सेवा देणार्‍या उद्योगांना सकाळी 10 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सेवा देता येणार आहे.
ज्या नागरिकांना पास देण्यात आले आहेत त्यांना त्याचा वापर निर्धारित केलेल्या वेळातच करता येणार आहे. इतर वेळेत ते पास चालणार नाहीत. आरोग्य सेवा, अत्यावश्यक सेवा सुविधा यांना सूट आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या