कोरोना – केंंद्र आणि राज्यसरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर महाराष्ट्रातील कोरोना बाबतचा आढावा घेण्याची जबबदारी दिल्याचे जाहीर झाल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये राजकीय श्रेयवादाचे युध्द रंग्नायाची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय. ट्वीटकरून रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

कोरोना च्या संकटावर महाविकास आघाडी सरकार उत्तम पद्धतीने उपाययोजना करत आहे. याबाबत केंद्र सरकारने नितीन गडकरी साहेबांवर महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याचे कळतंय. ही जबाबदारी समन्वयाचे असेल अशी अपेक्षा आहे. पण समन्वय ऐवजी समांतर जबाबदारी असेल तर ते योग्य वाटत नसल्याचं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांनी गडकरींना राज्यात केंद्रानं दिलेल्या निर्देशांचे पालन होते किंवा नाही, तसेच केंद्राकडून अधिक मदतीची गरज आहे काय, याबाबत राज्यातील जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून खात्री करून घेण्याचं आवाहन केलं होतं. या प्रकरणी नितीन गडकरींनी राज्यातील 17 जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला आहे. मात्र आता याप्रकरणी राजकारण होताना दिसते आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *