Friday, May 3, 2024
Homeनाशिकघोटी : कलापथकाद्वारे करोना रोखण्यासाठी लोकप्रबोधन

घोटी : कलापथकाद्वारे करोना रोखण्यासाठी लोकप्रबोधन

घोटी | Ghoti

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत घोटी ग्रामपालिकेने कलापथकाद्वारे करोना प्रतिबंधासाठी जनजागृती केली.

- Advertisement -

गाणे व पोवाड्याच्या माध्यमातून कलापथकाने नागरिकांचे प्रबोधन केले. घोटी ग्रामपालिकेनेही उखान्यांच्या माध्यमातून भिंतीपत्रके तयार करून कोरोना निर्मूलनासाठी शहरात जनजागृती केली.

शासनाच्या वतीने जामनेर येथील कलापथक तालुक्यात दाखल झाले असून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत गावागावात जाऊन सोशल डिस्टिंगशनचे पालन करून करोना हद्दपार करण्यासाठी व प्रतीबंधासाठी गाणे, पोवाड्याच्या माध्यमातून नागरिकांना प्रबोधन केले.

कलापथकाचे गायक शाहीर संतोष सराफ, नारायण लोहार, हरिदादा लोहार आदींनी लोकगीतातून प्रबोधन करून गर्दीत जाणे टाळणे, सोशल,फिजिकल डिस्टिंगशन राखणे, सातत्याने हात धुणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे तसेच कामाशिवाय घराबाहेर न पडणे आदींबाबत जनजागृती केली.

यावेळी घोटी ग्रामपालिका सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, संजय आरोटे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदळे, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या