Friday, May 3, 2024
Homeनाशिकआर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थीचे 'हॅपी लँडिंग'

आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थीचे ‘हॅपी लँडिंग’

नाशिक | Nashik

युद्धभूमीवर आपली भूमिका फार महत्वाची असते, त्यामुळे तुमचं ज्ञान आणि कौशल्य हे कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी महत्वाचे ठरते, असे प्रतिपादन मेजर जनरल अजयकुमार सूरी यांनी यावेळी केले. ते आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या 34व्या तुकडीचा दीक्षां सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

- Advertisement -

येथील गांधीनगर कॉमबॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या 34 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल अजयकुमार सुरी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की युवा लढाऊ वैमानिकांचे अभिनंदन करतो, तुम्ही घेतलेल्या ज्ञानाच्या, कौशल्या च्या जोरावर यश संपादन करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून युद्धभूमीवर आपली महत्वाची भूमिका पार पाडणे आवश्यक असते. तसेच कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत लढाऊ वैमानिक हे स्वतःच्या कौशल्याधारे सुरक्षित उड्डाण करत सैनिकांना सर्वोतोपरी मदत करत असतात. ती भूमिका तुम्ही जोख बजावाल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली

दरम्यान या १३ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीतुन ३३ वैमानिकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. २००३ साली स्थापन झालेल्या या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत शेकडो लढाऊ वैमानिक देशसेवेत दाखल झाले आहेत. मंगळवारी (दि.29) झालेल्या सोहळ्यात अतिथी मेजर जनरल अजयकुमार सुरी हे खास बग्गीतून एअरफील्ड मैदानावर दाखल झाले होते.

३३व्या दीक्षांत सोहळ्यात कॅप्टन अमितकुमार दहिया, असद अहेमद, आयुष कावटीयाल, विक्रमजीतसिंग, शुभम शुक्ला, मधुर दुबे, शंकर बी, विकास चौहान, शुभम ढिल्लोरे, रोहितसिंग यादव, अजयप्रकाश, यांच्यासह 33 वैमानिकांना गौरविण्यात आले.

विशेष सन्मान

1.कॅप्टन सचिन गुलीया- फ्लेजिंग ट्रॉफी

2.कॅप्टन दिवाकर- पी के गौर स्मृतीचषक

3. कॅप्टन प्रभुदेवन – एअर ओबीसर्वएशन

4. कॅप्टन तारीफ सिंग – एस के शर्मा स्मृतीचषक

5. कॅप्टन संतोषकुमार – अष्टपैलू कामगिरीसाठी मानाची ‘सिल्व्हर चित्ता’ ट्रॉफी पटकाविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या