प्रिया प्रकाश वारियरवरून बॉलिवूडच्या दोन डायरेक्टर मध्ये वाद

0
मुंबई : गेल्या काही दिवसापासून आपल्या हटके अदांनी चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या जादुई नजरेने सगळ्यांना वेड लावणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा कधीच सुरू झाल्या आहेत. पंरतु प्रिया ने आपल्या प्रोडक्शन हाऊसला काम करावे यासाठी बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध डायरेक्टर मध्ये सध्या वाद पेटला आहे.

इंस्टाग्राम व सोशल मीडिया मध्ये सध्या सर्वदाहीक चर्चेत असलेली प्रियाचे स्टार चांगलेच जोरात आहे. प्रियाला आपल्या सिनेमात घेण्यावरून बॉलिवूड दिग्दर्शकांत आपआपसांत चढाओढ सुरु झाली आहे. बॉलिवूडचे दोन आघाडीचे दिग्दर्शक -निर्माते प्रिया प्रकाश वारियरला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहेत. तूर्तास प्रियाने कुठलाही बॉलिवूड प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. पण करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला या दोघांनाही ती आपल्या चित्रपटात हवी आहे. याचवरून म्हणे या दोघांत चढाओढ सुरु झाली आहे.

करण जोहर प्रियाला ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये घेऊ इच्छितो तर साजिद त्याच्या अन्य एका आगामी चित्रपटात प्रियाला कास्ट करू इच्छितो. आता प्रिया या दोघांपैकी कुणाची आॅफर स्वीकारते, हे तर येणारा काळचं सांगेल.

LEAVE A REPLY

*