ग्राहक पंचायतीचा वीज मंडळाला शॉक; शेतकऱ्याला 10 हजार रूपये भरपाई

0

नाशिक । दि. 3  प्रतिनिधी
कृषीपंप धारकांवर थकित वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवायी महावितरणने सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांना रिडींग न घेताच अव्वाच्या सव्वा वीज बिले दिल्याने या प्रकरणी ग्राहक पंचातीने एका प्रकरणात चांदोरी येथील शेतकर्‍यास 10 हजार रूपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली.

त्यामूळे ज्या शेतकर्‍यांना अशा प्रकारची अंदाजे वीज बिले प्राप्त झाली आहे त्यांनी ग्राहक पंचायतीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कृषींपपाच्या थकित बीलापोटी वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. नाशिक शहर मंडलातील 1 लाख 65 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 591 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

यातील 1 लाख 64 हजार ग्राहकांकडे 43 कोटी रुपयांची चालू बिले थकीत आहेत. मालेगाव मंडलातील 1 लाख 39 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 592 कोटी रुपयांची वीजबिले थकीत असून यातील 1 लाख 38 हजार 300 ग्राहकांकडे 35 कोटी 42 लाख रुपयांची चालू थकबाकी आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांना मीटर रिडींग न घेताच अंदाजे बिले प्राप्त झाली. यापैकीच चांदोरी येथील शेतकरी जगन्नाथ नाठे यांना 32 हजार रूपये वीज बील प्राप्त झाले.

यासंदर्भात त्यांनी ग्राहकपंचायतीकडे धाव घेतली असता वीज कायदा 2003 सेक्शन 55 व 57 तसेच भरपाईचा कायदा 2005 नुसार अंदाजे दिलेले बिल बेकायदेशीर असून त्याबददल प्रतीमाह 400 रूपये प्रमाणे 10 हजार रूपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

तसेच अंदाजे बील व प्रत्यक्ष रिडींग नूसार बिल यातील फरक संबधित मीटर रिडर इंजीनिअर यांच्या पगारातून कापण्यात यावा असेही या आदेशात म्हटले आहे. नाठे यांना 32 हजार रूपये बील आले होते.

मात्र प्रत्यक्षात 8 हजार रूपये बील झाले. त्यांना 10 हजार रूपये भरपाई मिळवून देण्यात आली. त्यामूळे ज्या शेतकर्‍यांना अशा प्रकारची अंदाजे बीले प्राप्त झाली असतील त्यांनी वीज ग्राहक तक्रार समिती विद्युत भवन नाशिकरोड येथे तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*