आंतरराष्ट्रीय दर्जाची केपीएमजी कंपनी ‘नाशिक स्मार्ट सिटी’ सल्लागार

0
नाशिक । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेले वारासणी शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी सल्लागार म्हणुन जबाबदारी घेतलेली आंतरराष्ट्रीय ख्यातीची के. पी. एम. जी. अ‍ॅडव्हाझरी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची नाशिक स्मार्ट सिटीकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणुन निवड करण्यात आली असल्याची माहिती नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सिताराम कुंटे यांनी दिली.

दरम्यान कंपनीसाठी महापालिकेच्या पश्चिम विभाग कार्यालयातील जागा निश्चित करण्यात आली असुन पुढील चार महिन्यात या नवीन कार्यालयात कंपनी संचालकांनी बैठक होणार आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीच्या कामांना वेग देण्यासंदर्भात केंद्राकडुन सुचना दिल्या जात असुन याच पार्श्वभूमीवर कंपनी संचालकांची बैठक आज (दि.22)अध्यक्ष सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सिडकोच्या सह कार्यकारी संचालक श्रीमती प्राजक्ता लवगारे आदीसह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार कंपनी नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. याकरिता काढण्यात आलेल्या निवीदेत केपीएजी, क्रिसील, टीसीआय, आयएलएफ यासह पाच कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

यात तांत्रिक व वित्त संदर्भातील सादरीकरणानंतर के. पी. एम. जी. अ‍ॅडव्हाझरी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापकिय सल्लागार म्हणुन निवड करण्यात आली. तसेच कंपनीसाठी भरण्यात येणार्‍या पाच प्रमुख पदांपैकी कंपनी सेक्रेटरी महेंद्र शिंदे , चीफ फायनान्स आफिसर बाबुराव निर्मळ , आयटी हेड प्रमोद गर्जुर यांची नियुक्ती करण्यात आली असुन मुख्य अभियंता आणि नगर रचनाकार ही पदे प्रतिनियुक्तीवरुन लवकरच भरली जाणार असल्याचेही कुंटे यांनी सागितले.

LEAVE A REPLY

*