संविधान दिनानिमित्त ‘संविधान प्रस्तावने’चे सामुहिक वाचन

0
नाशिक | संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय एकता मंचतर्फे(राएमं) राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा घेत संविधान प्रस्तावानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदु-मुस्लिम बांधव व राएमंचे पदाधिकारी उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त रविवारी(दि.२७) हुतात्मा स्मारक येथे  सर्व धर्मिय सदभावना प्रार्थना बरोबरच हुतात्मा स्मारकवर मेणबत्ती पेटवून व फुले वाहत  हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

संविधानाचा आदर करत धर्मनिरपेक्षता टिकवून देशाची राष्ट्रीय एकात्मा सर्व स्तरावर बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सुर्यवंशी, मंचचे संस्थापक अध्यक्ष  खान नजमुल इस्लाम, सिराजुद्दीन हुड्डा, रियाज सय्यद, दिलिपसिंह बेनिवाल, विनायक पाईकराव, शेख नदीम अहेमद, युनूस शेख, खान सानिया अरशीन, निलेश ठुबे, संकेत नेरकर, राजेंद्र गवारे, सुरेश भोरे, सागर जाधव, रामदास गावित आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*