मालेगाव महापौरपदी काँग्रेसचे रशिद शेख, उपमहापौरपदी सेनेचे सखाराम घोडके

0

मालेगाव (प्रतिनिधी) ता. १४ : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव महानगरपालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज झाली.

 

त्यात काँग्रेसचे माजी आमदार शेख रशिद शेख शफी ४१ मते मिळवून महापौरपदी विराजमान झाले. 

उपमहापौर पदी शिवसेनेचे सखाराम घोडके विजयी झाले.

 

नवनिर्वाचित महापौर रशिद शेख आणि उपमहापौर सखाराम घोडके

रशिद शेख यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल आघाडीचे नबी अहमद यांना ३४ मते मिळाली.

एमआयएमने या निवडणूकीत तटस्थतेची भूमिका घेतली. तर भाजपाने आघाडीच्या बाजूने मतदान केले.

 घोडके यांना ४1 मते मिळाली. अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद (राष्टवादी / जनतादल) यांना  27 मते मिळाली. सुनील गायकवाड ( भाजपा ) यांनी माघार घेतली. उपमहापौरपदासाठी भाजप-एम आय एम तटस्थ राहिले

 

संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या महापौर-उपमहापौर निवडीसाठी उद्या (दि. 14) बुधवारी नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेषसभा आज संपन्न झाली.

काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद महापौरपदी तर शिवसेनेचे सखाराम घोडके यांची उपमहापौरपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास आधीच स्पष्ट झाले होते

राष्ट्रवादी-जनता दल आघाडीतर्फे नबी अहमद महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी आघाडीचे मन्सुर अहमद व भाजपाचे सुनिल गायकवाड हे रिंगणात होते.

दरम्यान, महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहासह महानगरपालिकेच्या तिघा बाजूंनी सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व पत्रकार वगळता कुणालाही मनपा संकुलात प्रवेशास बंदी घालण्यात आली होती.

आज सकाळी 11 वाजता मनपा सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली महापौर-उपमहापौर निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला.

गत महिन्यात पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला. जनतेने कुणालाही स्पष्ट कौल न देण्याची परंपरा कायम राखली होती.

 

LEAVE A REPLY

*