दलबदलूंमुळेच काँग्रेस कमजोर : आ. अमिता भूषण

0

राहुरीत पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आढावा बैठक 

राहुरी (प्रतिनिधी) – दलबदलूंमुळेच काँग्रेस कमजोर झाली. ज्यांना पक्षातून जायचे, त्यांना जाऊद्या, कार्यकर्ते कमी असले तरी काँग्रेस पक्षाला संघर्ष करण्याची गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा आहे. काँग्रेसची संघटनात्मक ताकद मजबूत असून ती आणखी भरभक्कम करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकीनिमित्त नगर जिल्ह्यात दौरा सुरू आहे. तालुकानिहाय ग्रामीण भागात जाऊन काँग्रेस कार्यकत्यार्ंशी साधलेल्या संवादातून पुन्हा नवीन उर्जा निर्माण झाल्याचे जाणवले, असा आशावाद बिहार येथील बेगुसराय विधानसभेच्या आमदार अमिता भूषण यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर राहुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंंच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. नंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, आगामी चार दिवसात तालुकास्तरावरील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नेमणूका करण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. 6 ऑगस्टला क्रियाशील सदस्यांची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 20 तारखेपर्यंत तालुकाध्यक्षांच्या निवडी निवडणुकांद्वारे करण्यात येणार आहे.
दौर्‍याच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावना श्रेष्ठीपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच तालुकाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. काँग्रेस पक्षात संघटनात्मकतेला महत्व असून पक्षवाढीसाठी ते पुरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, रूद्राक्ष युवामंचाचे संस्थापक अध्यक्ष नितीन तनपुरे, नगरसेवक सोन्याबापू जगधने, डॉ. जयंत कुलकर्णी, गणेशराव भांड यांनी राहुरी तालुक्याच्या वतीने आमदार भूषण यांचा सत्कार केला. तालुकाध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी तालुक्याच्या पक्षीय संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला.
माजी आमदार जयंत ससाणे म्हणाले, डॉ. तनपुरे कारखाना सुरू झाल्यानंतर राहुरीच्या शेतकर्‍यांनी याच कारखान्याला ऊस देऊन ही संस्था वाचविली पाहिजे. काँगे्रस पक्षाच्या अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविकात डॉ. जयंत कुलकर्णी म्हणाले, पक्षाचे निरीक्षक व सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्रित आल्याने आमचा उत्साह वाढला आहे. राहुरी तालुक्यातील जुन्या जाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसारच तालुकाध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांची वाटचाल चालू आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम समाधानकारक आहे. ग्रामीण भागातही काँग्रेसचे काम कार्यकर्ते प्रामाणिकपणे करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी सचिन गुजर, डॉ.धनंजय मेहेत्रे, नंदकुमार डोळस, विजय डौले, चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेशराव भांड, अतिक बागवान, बाळासाहेब भांड, राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, अरूण साळवे, शिवाजी गाडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव कडू, बाळासाहेब खांदे, अ‍ॅड. पंढरीनाथ पवार, भास्कर वरघुडे, ज्ञानेश्‍वर पोपळघट, कंकर जनाब, बिलाल शेख, जिशान शेख, आप्पा तनपुरे, राम शिंदे, सुरेश भुजाडी, प्रदीप भुजाडी, प्रतीक तनपुरे, गणेश खैरे, मुज्जू कादरी, मुज्जू पठाण, पप्पू पठाण, विशाल बागडे, राजू मकासरे, दीपक कोल्हे, संतोष शेवरे, अफनान आत्तार, उमेश शेळके, राजू शेख, प्रतीक नाईक, आदींसह राहुरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*