श्रीरामपुरात युवक काँग्रेससाठी 70 टक्के मतदान

0

आ. कांबळे- ससाणे गटांत बाचाबाची

श्रीरामपूर (प्रतिनिधी): जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांसाठी काल संपूर्ण जिल्हाभरात मतदान प्रक्रिया पार पडली. श्रीरामपूर शहरात व्यापारी मंगल कार्यालय येथे 1150 मतदारांपैकी 730 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. श्रीरामपूरसाठी सुमारे 70 टक्के मतदान झाले. जिल्हा युवक काँग्रेससाठी काल संपूर्ण जिल्हाभरात मतदान प्रक्रीया पार पडली. श्रीरामपूर शहरात व्यापारी मंगल कार्यालय येथे सकाळी 8.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रीयेला प्रारंभ झाला. सकाळी 10 वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला नाही. मात्र 10 नंतर मतदान केंद्रावर गर्दी पहावयास मिळाली.

मतदान केंद्रावर सर्रासपणे बोगस मतदान झाल्याचा आरोप आ. भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव नगरसेवक संतोष कांबळे यांनी केला. माजी नगरसेविका सौ. सुधा संतोष कांबळे या मतदान करण्यासाठी गेल्या असता त्याठिकाणी त्यांना तुमचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. यावर संतोष कांबळे यांनी आक्षेप घेत तक्रार नोंदविली. त्यावेळी चांगलीच शाब्दिक चकमक झाली. बोगस मतदान होत असल्याने त्याठिकाणी माझ्यासमोर मारामार्‍या झाल्या असल्याचे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत ससाणे गटाशी संपर्क साधला असता मारामारीच्या घटनेचा इन्कार करण्यात आला. श्रीरामपूर पालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे हे प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदासाठी उभे आहेत. त्यांच्या स्पर्धेत 24 उमेदवार आहेत. तर श्रीरामपूर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदासाठी ससाणे गटाचे सिध्दार्थ फंड, आ. कांबळे गटाचे रोहित श्यामलिंग शिंदे, अमोल नाईक यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात आहेत.

 

LEAVE A REPLY

*