Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

शिवसेनेला काँग्रेसच्या होकाराची प्रतिक्षा

Share

राष्ट्रवादीची भुमिका वेट अ‍ॅण्ड वॉच

मुंबई- राज्यात सत्तेचं नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता असून काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत सरकार स्थापन करण्याचा विचार करत असल्याची सुत्रांची माहिती आहे. विचारधारा पूर्पणणे वेगळी असली तरी काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबात सकारात्मक आहेत.

मात्र राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध आहे. काँग्रेसच्या बैठकीत यासंबंधी चर्चा सुरु असून अध्यक्ष सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला सध्या तरी काँग्रेसच्या होकारासाठी प्रतिक्षा पाहावी लागत आहे. तर राष्ट्रवादीने काँग्रेसची भुमिका जाहीर झाल्यावर समर्थनाच उत्तर देणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची वेट अ‍ॅण्ड वॉच भुमिका बजावत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!