Type to search

Breaking News Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

महाराष्ट्रात शिवसेनेला ‘सोनिया’चे दिवस; काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन होणार

Share

मुंबई | वृत्तसंस्था

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला सोनियाचे दिवस आले आहेत. कॉंग्रेसचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात शिवसेनेकडून गोड बातमी येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला मिळालेल्या राज्यापालकडून निमंत्रण ते सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेला जडच गेले आहे.

कॉग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आमदारांच्या बैठकांवर बैठका झाल्या. त्यानंतर सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!