Thursday, May 2, 2024
Homeनाशिकघोटीत काँग्रेसची आढावा बैठक

घोटीत काँग्रेसची आढावा बैठक

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

काँग्रेसच्या (Congress) वाढीसाठी ध्येयधोरणे राबविण्याकरिता प्रयत्न करावे. तसेच तळागळात जाऊन कामे करावीत व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कसे वाढेल यासाठी सर्वांनी मजबुतीने काम करावे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे (Congress District President Tushar Shewale) यांनी केले.

- Advertisement -

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोटीत (Ghoti) तालुका काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील राजाराम साळवी मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे बोलत होते.

आगामी निवडणुकीत इगतपुरी नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर काँग्रेसचीच सत्ता आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी केले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जनार्दन माळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ होते.

दरम्यान, या आढावा बैठकीसाठी ओबोसी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर कडु, घोटी शहराध्यक्ष गोपाळ भगत, माजी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, उपाध्यक्ष उत्तम भोसले, अरूण गायकर, विधानसभा युवक तालुकाप्रमुख किरण पागेरे, पंढरीनाथ ब-हे, ॲड. जी. पी. चव्हाण, देवराम मराडे, बाळासाहेब कुकडे, पंढरीनाथ लंगडे, पंकज माळी, इगतपुरीचे शहराध्यक्ष संतोष सोनवणे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या