काँग्रेस मध्यावती निवडणूकीला तयार

0

ना. राधाकृष्ण विखे यांची टीका

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल म्हणून मुख्यमंत्री मध्यावती निवडणूकीचे वक्तव्य करतात.मात्र, मध्यावती निवडणूकीला काँग्रेस देखील तयार आहे. सरकार घोषणा करण्यातच माहिर असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
राज्य सरकारने मध्यावती निवडणुकीपेक्षा तत्वता: व अशंता हा शब्दाचा सुरु असलेला खेळ बंद करुन कर्जमाङ्गी संदर्भात तात्काळ आदेश काढून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा. कर्जमाङ्गीसाठी काँग्रेस अघाडीने संघर्ष यात्रा काढली. त्यामूळे शेतकरर्‍यांची आंदोलन करण्याची मानसकिता तयार झाली.शेतकरी संघटनांना जे करता आले नाही.ते आम्ही केलाचा दावा ना.विखे यांनी केला.शिवसेनेने शेतकर्‍यांना 10 हजार रुपये त्वरीत द्यावे अशी मागणी केली.
त्यालाही सरकारने वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्याचा टोला ना.विखे यांनी लगावला.शेतकर्‍यांचे आत्महत्याचे राजकारण न करता त्या रोखण्यासाठी दिर्घकालीन उपाय-योजना राबविणे गरजेचे आहे. जलसाठे, शेतमाल साठवणुक व शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे.मागच्या सरकारच्या काळात शेतमाल साठविण्याचे धोरण आपण आखले.मात्र, दुर्देवाने सकारात्मक पाठबळ न मिळाले नसल्याची खत ना.विखे यांनी व्यक्त केली.

तूर घोटाळा चौकशीची गरज
संघर्ष यात्रेमुळे सरकारला सुमारे 1 लाख टन तूर खरेदी करावी लागली.जो हमीभाव ठरला तो शेतकर्‍यांंना मिळाला नाही.मग तूदाळ व्यापार्‍यांकडे गेली कशी.सदर प्रकारणाची चौकशी होणे गरजेचे असून चौकशीचा ङ्गार्स होता कामा नये.शेतकर्‍यांना बोनस स्वरुपात भरपाई देण्याची मागणी ना. विखे पाटील यांनी सरकारकडे केली.

LEAVE A REPLY

*