Type to search

Breaking News Featured maharashtra देश विदेश नाशिक मुख्य बातम्या

सुरक्षेचे कारण पुढे करत राहुल गांधी यांची सिन्नरमधील सभा रद्द

Share

सिन्नर | विलास पाटील

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि. 26) एप्रिल रोजी सिन्नर येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सभा रद्द करून संगमनेर येथे घेतली जाण्याची शक्यता आहे.

गांधी यांच्या सभेसाठी आडवा फाट्यावरील वंजारी समाजाच्या मैदानाची निवड करण्यात आली होती. मात्र, मैदानावरील विजेच्या टॉवर लाईन व उंच इमारती सुरक्षेत अडचणीच्या ठरत आहेत.

हेलिकॉप्टर कुठे उतरावे याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही. ओझर येथे हेलिकॉप्टर उतरवून रस्त्याने राहुल यांना सिन्नरला आणणे पोलिसांवर भार वाढवणारे असल्याने तो ही पर्याय रद्द करण्यात आला.

26 तारखेला राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्या सभा आधीच ठरलेल्या असल्याने पोलिसांवर अजून दबाव येणाची शक्यता, या सर्वच बाबींचा विचार करून सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील सुरक्षा यंत्रणेसोबत सकाळ पासून चर्चा करीत होते, सभेसाठी दिलेली तारीख व सभेपुर्वी 36 तास आधी व्यासपीठ व मैदान सुरक्षा यंत्रणा ताब्यात मागत होती.

एवढ्या कमी वेळेत हे अशक्य असल्याचे कारण देत शेवटी सिन्नरबाहेर सभा घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे, सुरक्षा यंत्रणा कायद्याच्या नावाखाली फार अडून पाहत असल्याची भावना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, लाव रे तो व्हिडीओ मुळे मनसेना अध्यक्ष चांगलेच प्रकाशझोतात आहेत. ज्या दिवशी राज यांची नाशिकमध्ये सभा आहे त्याच दिवशी राहुल गांधी सभा घेणार असल्यामुळे सभेला गर्दी जमण्याची शक्यता कमी असल्याने सभा रद्द केली असावी अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.

तर राहुल गांधी यांच्या सिन्नर येथील सभेचा फायदा दिंडोरी, शिर्डी, नाशिक तसेच धुळे लोकसभेच्या उमेदवारांना होणार होता त्यामुळे सभा रद्द झाल्याच्या वृत्ताने नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

तर एकट्या संगमनेरमध्ये जर सभा घेण्याबाबत चाचपणी सुरु असेल तर केवळ शिर्डी येथील उमेदवाराला याचा फायदा होईल यामुळे संगमनेर ही सभेची जागा योग्य नसल्याची भावना स्थानीक नेते व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, स्थानिक नेत्यांनी सभेसाठी धोक्याबाहेर असलेल्या दोन तीन पर्यायी जागाही सुरक्षा यंत्रणेला दाखवल्या होत्या. मात्र, यंत्रणेने साफ याकडे दुर्लक्ष करत सभेसाठी योग्य जागा नसल्याचे सांगितले अशी माहिती सांगळे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!