Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, राजकारणातील अनेकांनी वाहिली आदरांजली

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे. वयाच्या 40व्या वर्षी राजीव गांधींची आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. राजकारणात प्रवेश केल्यावर राजीव गांधींचा अंत देखील शोकांतिकेचाच होता आणि 21 मे 1991 रोजी रात्री 10:21 वाजता तमिळनाडूच्या श्रीपेरंबुदुर येथे त्यांचीही हत्या करण्यात आली.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी सकाळी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद हे उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस या आठवड्यात पूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. राजीव गांधी यांचे योगदान, विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी यावर यानिमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काँग्रेसने मंगळवारी (20 ऑगस्ट) दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात एक स्मृती कार्यक्रम आयोजित केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!