Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितचा अल्टिमेटम

Share

30 जुलैला पहिली यादी

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. ते केवळ माध्यमांमध्येच प्रतिक्रिया देत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला युतीचा निर्णय घेण्यासाठी 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर निर्णय न झाल्यास नाइलाजाने 30 जुलैला वंचित आपली विधानसभेच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करेल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिला.

पुंडकर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने पुन्हा काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला आगामी विधानसभेत वंचितशी आघाडी करायची असेल, तर त्यांनी ताबडतोब संपर्क साधायला हवा. हा प्रस्ताव देऊन अनेक दिवस झाले, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. ते जे काही बोलत आहेत ते केवळ माध्यमांमध्येच बोलत आहेत. वंचितशी त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही.

प्रस्तावाला प्रतिसाद नाही
आघाडी प्रस्ताव देऊनही काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला आमची निवडणुकीची तयारी पूर्ण करून ठेवावी लागत असल्याचेही पुंडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून 30 जुलैपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांशी किंवा वंचित बहुजन आघाडीशी संपर्क केला गेला नाही, तर ‘वंचित’ आपली विधानसभा उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!