काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू; अजित पवार मुंबईतच
Share

जयंत पाटील यांची माहिती
मुंबई- शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आज सायंकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची होणारी समन्वय बैठक पुन्हा सुरू झाली आहे. काही वेळेपुर्वी अजित पवार नाराज आहेत आणि ते तडकाफडकी बारामतीला निघून गेलेत, या बातमीत कोणतंही तथ्य नसून अजितदादा मुंबईतच आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आता सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार मुंबईतच असल्याचे माध्यमांना सांगितले.