Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक रद्द

Share

मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द झाली आहे. काही तरी बिनसल्याने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार बैठकीतून निघून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ते तडकाफडकी बारामतीच्या दिशेने निघाले आहेत. समन्वय समितीची बैठकही रद्दचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे नेते उपस्थित होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी घेरल्यानंतर बैठक रद्द झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नंतर बैठक कधी होईल हे आपण सांगू शकत नाही असे सांगताना अधिक माहिती न देता नो कमेंट्स असे शब्दही त्यांनी उच्चारले आहे. यावेळी अजित पवार नेहमीसारखे सामान्य वाटले नाहीत तर त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव रागात असल्यासारखे होते.

दरम्यान, राष्ट्रवादीसोबत आमची बैठक होईल अशी चर्चा होती पण अद्याप त्यांच्याकडून बैठकीसाठी निरोप आलेला नाही तो आल्यानंतर आम्ही उपस्थित राहू असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!