Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

आमदार बाळासाहेब थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Share

संगमनेर | प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत ‘घराघरात बाळासाहेब थोरात’ अशा घोषणा दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!