Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांना म्हटले ‘क्रांतीकारी’

Share

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत नक्षलवादी हल्ल्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. निवडणूक प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी याच मुद्द्यावर भाष्य केलंय. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘ते लोक क्रांतीसाठी निघाले आहेत. त्यांना कुणीही रोखू शकत नाही,’ असं ते म्हणाले.

नुकताच दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात एका कॅमेरामनचा मृत्यू तर दोन जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध सर्वचस्तरातून करण्यात आला होता. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जे दुर्लक्षित होते आणि ज्या लोकांना त्यांचा अधिकार मिळत नाही. ज्यांचा अधिकार हिसकावून घेतला जातो, वरच्या स्तरावरील काही लोक त्यांचा अधिकार हिसकावतात तेव्हा ते आपल्या प्राणांची आहुती देतात, असं बब्बर म्हणाले.

ते चुकीचं करत आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या बंदुकीनं तोडगा निघणार नाही. संवादानेच मार्ग निघेल. बंदुकीनं प्रश्न सुटणार नाहीत. क्रांतीसाठी निघालेल्या लोकांना भीती दाखवून किंवा प्रलोभनं देऊन रोखता येणार नाही. नक्षल्यांचं आदोलन अधिकारांसाठी सुरू झालंय. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधायला हवा,’ असंही ते म्हणाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!