महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले
Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी
महाराष्ट्रातीला सत्ता नाट्य संपण्याचे नाव घेत नाहीये. आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती बघता. भाजपकडून लोकशाहीची हत्या झाली असल्याचे ते म्हणाले. आज मी याठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिलो होतो. राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पोहोचले याची खंत वाटते असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ झालेला यावेळी बघायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर राहुल गांधी प्रथमच उत्तरल्याने याकडे राज्याचेही लक्ष लागून होते.
दरम्यान, राज भवनावर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्तेची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यपालांच्या भेतीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र में लोकतंत्र की हत्या हुई : श्री @RahulGandhi pic.twitter.com/wJXGjZ9NsG
— Congress (@INCIndia) November 25, 2019