कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

0

मुंबई (प्रतिनिधी) | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे आज सकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. चाणक्यपुरीतील प्रिमास रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गुरुदास कामत हे कामानिमित्त दिल्लीत गेले होते. बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले.

मुंबईत कॉंग्रेसचे संघटन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. कामात यांच्या निधनाने काँग्रेसने महाराष्ट्रातील एक मोठा नेता गमवला आहे.

मुंबई काँग्रेसची धुरादेखील कामात यांनी सांभाळली होती. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणूकीपासून ते पक्षात सक्रीय कार्य करत नव्हते.

कामात यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*