Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

मोदींची स्तुती भोवली; माजी खासदाराची कॉंग्रेसमधून हकालपट्टी

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती करणाऱ्या कॉंग्रेस खासदाराची पक्षातू हकालपट्टी करण्यात आली आहे.  एपी अब्दुल्लाकुट्टी असे या नेत्याचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींची स्तुती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना रीतसर नोटीस पाठवून खुलासा करण्याची मागणी केली होती.

तेव्हापासूनच त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांच्याकडून खुलासाही मागवण्यात आला होता. मात्र, कुठलेही उत्तर त्यांनी पाठवले नसल्याने पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

मोदींनी गांधीवादी तत्वांना अवलंबले असून हेच त्यांच्या यशस्वीतेचे सूत्र असल्याचे ते म्हणाले होते. यादरम्यान त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचीदेखील प्रशंसा केली होती.

पुढे उज्वला योजनेवर बोलताना ते म्हणाले की, मोदींच्या प्रभावी अंमलबजावणीमुलेच बिपीएल ग्राहकांपर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचले आहे.

अब्दुल्लाकुट्टी यांना 2009 मध्येही मोदी यांचे कौतुक केल्यामुळे सीपीआईमधूनही हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 1999 आणि  2004 मध्ये कन्नूर येथे खासदारकी भूषवली होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!