काँग्रेसची पक्षातंर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू

0

6 तारखेला क्रियाशिल मतदारांची यादी जाहीर होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षातंर्गातील निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षाकडून बिहार राज्याच्या महिला प्रदेशध्यक्षा अमित भूषण यांना जिल्हा दौर्‍यावर पाठवले असून त्यांनी या निवडणुकीसाठी शनिवारी आढावा घेतला. येत्या 6 ऑग्रस्टला पक्षाच्या नोंदवलेल्या क्रियाशिल सदस्यांची मतदारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी त्या नगरच्या शासकीय विश्रामगृहावर त्या माध्यमांशी बोलत होत्या. येत्या चार ते पाच दिवसांत तालुकास्तरावरील निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या नेमुणका करण्यात येणार आहेत. त्यानंतर 6 तारखेला क्रियाशिल सदस्यांची मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानंतर 20 तारखेपर्यंत ब्लॉक (तालुकाध्यक्षांच्या) निवडी निवडणुकांव्दारे करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यात आल्या असून आवश्यक त्या सुचना श्रेष्ठीपर्यंत पोहवण्यात येणार आहेत. पक्षाच्यावतीने क्रियाशिल सदस्यांची नोंदणी करण्यात आली असून स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेवून ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी करण्यात येणार आहेत. काँग्रेसपक्षामध्ये संघटनात्मकतेला महत्व असून पक्ष वाढीते आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भेंड्याहून शरद पवार यांच्या गौरव्यामुळे विरोधी पक्ष नेते विखे उशीरा नगरमध्ये दाखल झाले. तो निरिक्षकांची बैठक संपली होती. मात्र, कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर उपस्थित होते. विखे यांनी कार्यकर्त्यांना पक्षातंर्गत बैठकीबाबत सुचना दिल्या. प्रत्येक तालुक्यात या निवडणुकीच्या प्रक्रिये दरम्यान कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलेल्या सविता मोरे यांनी विखे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर विखे यांनी मोरे यांना सध्या शांत राहण्याचा सल्ला दिला.

शहर महिला काँग्रेसमध्ये झालेल्या राड्याबाबत निरिक्षक भूषण यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्याला स्थानिक विषयाची माहिती नाही. तसेच त्या पक्षातंर्गत होणार्‍या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी नगरला आल्या असून त्यांचा या वादाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*