Type to search

Loksabha Election : काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला

maharashtra मुख्य बातम्या राजकीय

Loksabha Election : काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला

Share
मुंबई : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेले जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या भेटीने काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर त्‍यांनी पक्षातील उमेदवाराविरोधात बंड पुकारले आहे. प्रथम आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्‍याचे सत्‍तार यांनी सांगितले होते. परंतु, आता त्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्‍यामुळे  त्‍यांना भाजपमधून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

साताऱ्याचे निंबाळकरांचा भाजपात उद्या प्रवेश
काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपाने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते.

दरम्यान, परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. परभणीतील राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. समीर दुधगावकर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!