काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्षांच्या निवडी पुढील आठवड्यात

0

विखे- थोरात गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा रस्सीखेच

अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गंत निवडणुका आता अंतिम टप्प्यावर पोहचल्या आहेत. तालुकाध्यक्ष (ब्लॉक अध्यक्ष), जिल्हा कार्यकारणी सदस्य, प्रदेश कार्यकारणी सदस्यांची निवडीच्या प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष आणि शहरजिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहे.
या निवडीवरून पुन्हा पक्षातील राजकारण तापणार असून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच वाढणार आहे.
प्रदेश काँग्रेस समितीने जिल्ह्यातील पक्षातंर्गत निवडणुकांची जबाबदारी बिहार राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष अमिता भूषण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानूसार भूषण यांचा जिल्हा दौरा झालेला आहे. मात्र, त्यानंतर बिहार राज्यातील पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पक्षांतर्गत निवडणुका लांबल्या होता.
आता जिल्ह्या पक्षाचे असणारे 18 ब्लॅक अध्यक्ष यांच्या निवडी पूर्ण झाल्या आहेत. यासह प्रत्येक ब्लॅकमधून जिल्हा कार्यकारणीवर 6 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यासह प्रदेश कार्यकारणीवरील सदस्यांच्या निवडी पूर्ण झाल्या असून आता निवड करण्यात आलेल्या सदस्यांच्या नावाच्या याद्या मंजूरीसाठी प्रदेशकडे पाठवण्यात आल्या आहेत.
14 तालुक्यांसह, संगमनेर, श्रीरामपुर, कोपरगाव आणि भिंगार या ठिकाणी स्वतंत्र ब्लक अस्तित्वात आहे. यातून जिल्हा कार्यकारणीवर निवड झालेल्या सहा सदस्यांना जिल्हाध्यक्ष पदासाठी मतदान करता येणार आहे. तर नगर शहरातील ब्लॅक समितीत निवड झालेले सदस्यांना शहरजिल्हाध्यक्ष पदासाठी मतदान करता येणार आहे.
येत्या आठ दिवसांत जिल्हाध्यक्ष आणि शहरजिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी पूर्ण करण्यात येणार आहे. दोन पदावर एका पेक्षा जास्त नावे आल्यास या ठिकाणी निवडणुकीचा पर्याय राहणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहरजिल्हाध्यक्ष पदाच्या नावावर विखे- थोरात गटाचा शिक्कामोहर्तब झाल्यास या दोन्ही निवडी बिनविरोध होणार आहे.
मात्र, जिल्ह्यातील आजपर्यंतची काँगAे्रस पक्षाची परंपरा पाहता या दोन्ही निवडी बिनविरोध होण्याची शक्यता तशी कमी आहे. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष जयंत ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. ही निवडणुक पक्षांतर्गत निवडीच्या प्रक्रियेचा भाग आहे. जिल्ह्यातील नेते या बाबत एकत्र बसून निर्णय घेतील.

विद्यमान परिस्थितीत जिल्हाध्यक्षपदासाठी विखे आणि थोरात गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. विद्यमान अध्यक्ष ससाणे यांना पुन्हा संधी मिळणार की या ठिकाणी नव्याने अध्यक्षपदावर अन्य कार्यकर्ता विराजमान होणार यासाठी थांबा आणि पहा असे सांगण्यात येत आहे. नगर शहरातही अशी परिस्थिती असून या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  

LEAVE A REPLY

*