युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी हर्षवर्धन देशमुख

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर लोकसभा युवक काँगे्रसच्या जिल्हा सरचिटणीसपदी हर्षवर्धन रवींद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्याचे निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रदीप राठोड यांनी हे नियुक्ती पत्र देशमुख यांना पाठविले आहे.

हर्षवर्धन देशमुख हे स्थापत्य अभियांत्रिकी पदविधारक असून ते साक्षी फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षणाचे उपक्रम राबवित आहेत. आपल्या कामाच्या माध्यमातून देशमुख यांनी नगर शहर व परिसरात युवकांचे चांगले संघटन केले आहे.

हर्षवर्धन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांचे पुतणे असून ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचे नातू आहेत. हर्षवर्धन देशमुख यांच्या नियुक्तीबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. आ. जयंतराव ससाणे, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँगे्रसचे अध्यक्ष सुजय विखे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*