Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

काँग्रेस आघाडी सोबत जाण्यासाठी शिवसेना अनुकुल – उद्धव ठाकरे

Share
जेएनयुमधील भ्याड हल्ल्याने मुंबईतील २६/११ ची आठवण करून दिली - मुख्यमंत्री, cm shivsena uddhav thackeray on jnu violence
मुंबई | प्रतिनिधी 
राज्यपालांनी काल आम्हाला 7.30 पर्यंतची मुदत दिली. त्यानंतर आज राष्ट्रपती राजवट लागू करून राज्यपालांनी सहा महिन्याची वेळ दिल्याने आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापनेसाठी सविस्तर चर्चा करू अशी माहिती शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली. काल आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क केला असे सांगताना त्यांनी भाजप दिवसातून तीन वेळा संपर्क करतात असे म्हटले होते याकडे लक्ष वेधले.
काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती, तशीच शिवसेनेलाही हवी होती. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ हवी होती. त्यासाठी वेळ वाढवून मागितला, पण राज्यपाल म्हणाले 48 तास नाही तर 6 महिने देतो, त्यांचे गणित मला अजून समजलेले नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या बाबत उपरोधीक टिका केली.
शिवसेना भाजप युती तुटली का या प्रश्नावर बोलताना त्यांनी खोटेपणा करण्यात आल्याने आम्ही चर्चा थांबवली असे सांगितले. ते म्हणाले की, चंद्रकात पाटील यांनी आम्हाल काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्या आम्ही स्विकारतो.
दरम्यान, दोन्ही काँग्रेस पक्षांनी आज एकत्रीत बैठक घेऊन सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांनी येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्ष सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करतील असे म्हटले आहे. त्यावर उध्दव ठाकरे यांनी आम्हाला देखील काही मुद्दयांवर स्पष्टता हवी असल्याने तिन्ही पक्ष बसून चर्चा करू असे म्हटले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!