Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहराच्या पाणी कपातीवरून विशेष सभेत गोधळ; शेलार बग्गांचा सभात्याग

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील पंचवटीसह काही भागात पुरेशे पाणी मिळत नसल्याने काहीअंशी कपातीसह एकवेळ पाणी पुरवठा कायम ठेवून गुरुवारची पाणी कपात रद्द करण्याची मागणीवर चर्चा करुन निर्णय देण्यास महापौर रंजना भानसी यांनी नकार दिल्याने आज (दि.9) च्या महापालिकेच्या विशेष महासभेत राष्ट्रवादी कॉग्रेस गटनेते गजानन शेलार व गुरमित बग्गा यांनी सभात्याग केला. दरम्यान महासभेनंतर नाशिकरोड विभागातील भाजप – सेनेच्या सहा नगरसेवकांनी गुरूवारचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करावा याकरिता आयुक्तांना निवेदन दिले.

महानगरपालिकेची आजची विशेष महासभा महिला बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती आणि विधी समिती यांच्या प्रत्येक नऊ सदस्य निवडीसाठी आणि स्थायीतील भाजपचा एक सदस्य निंयुक्तीसाठी बोलविण्यात आली होती.

या महासभेपुर्वी शेलार व बग्गा यांनी महापौरांना गुरुवारची संपुर्ण पाणी कपात रद्द करावी यासंदर्भात पत्र दिले होते. या महासभेत श्रध्दांजली व अभिनंदनाचे प्रस्तावाचे कामकाज झाल्यानंतर लगेच शेलार यांनी आमच्या पत्राचे वाचन करा अशी मागणी केली. त्यावेळी महापौरांनी पत्राचे वाचन नंतर असे सांगत आजच्या विषय पत्रिकेवरील विषय सुरू करण्याचे निर्देश नगरसचिवांना दिले.

त्यानुसार नगरसचिव गोसावी यांनी विषय वाचण्यास प्रारंभ केल्यानंतर शेलार – बग्गा यांनी जागेवर उभे राहत ‘ पाण्याचा हा प्रश्न शहराच्या जिव्हाळ्याचा असल्याने यावर चर्चा न करता निर्णय द्यावेत’ अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी शांत बसा, खाली बसा असे महापौरांनी उभयतांना सांगितले.

त्यावर तुम्ही काय करणार ? असे प्रति प्रश्न शेलार यांनी महापौरांना करीत निर्णय देण्याची विनंती केली. मात्र महापौराच्या आदेशानुसार नगरसचिवांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू केले. यामुळे संतप्त झालेले शेलार यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोलून दिले जात नसल्याने याचा निषेध करीत शेलार व बग्गा यांनी सभात्याग केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!