Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कृ. उ. बा. सभापती शिवाजी चुंबळे यांना सशर्त जामीन मंजूर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या बदल्यात तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली होती. दुसऱ्या दिवशी  त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलाकडून त्यांची पोलीस कोठडी  टळली होती.

अधिक चौकशीसाठी एसीबीने पोलीस कोठडी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे चुंबळे यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात होण्याची शक्यता होती. मात्र, आज चुंबळे यांना न्यायालयाकडून दिलासा. मिळाला असून  50 हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर झाला आहे.

यामध्ये चुंबळे यांना दर बुधवार आणि गुरुवारी सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट दोन महिन्यांसाठी असेल असेही यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच तक्रारदारावर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणण्याची अटदेखील यामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

कृ. उ. बा. समिती सभापती शिवाजी चुंभळेंची रवानगी सेन्ट्रल जेलमध्ये? घरात सापडले अडीच लाखांचे विदेशी मद्य आणि २२ तोळे सोनं

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!