Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedखरी संगणकीकृत शस्त्रं !

खरी संगणकीकृत शस्त्रं !

सध्या अत्यंत अचूक, कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म तंत्रज्ञानाचा जमाना आहे. ह्या दोन्हीच्या संगमातून परीकथेतच शोभतील अशा वस्तू प्रत्यक्ष वापरात आल्याचं आपण पहात आहोत. युद्धतंत्र कायमच चार पावलं पुढे असतं. किंबहुना, इतरत्र म्हटल्याप्रमाणे युद्धनीतीच्या दृष्टीने कालबाह्य झालेली तंत्रंच पुढील दोन-चार वर्षांमध्ये झिरपून सामान्यांच्या वापरात येत असतात. त्याबाबत…

डॉ. दीपक शिकारपूर

बदलत्या काळानुसार तंत्रंही बदलली असल्याने ‘शस्त्र हे शस्त्रासारखंच दिसलं पाहिजे’ असा पारंपारिक आग्रह धरण्याचे दिवसही संपले आहेत. सध्या अत्यंत अचूक आणि कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म तंत्रज्ञानाचा जमाना आहे. या दोन्हीच्या संगमातून फक्त पन्नास वर्षांपूर्वी स्वप्नातही येऊ न शकणार्या आणि परीकथेतच शोभतील अशा वस्तू प्रत्यक्ष वापरात आल्याचं आपण पहात आहोत. हे झालं आपल्या दैनंदिन जीवनाबाबत. युद्धतंत्र तर यापेक्षा कायमच चार पावलं पुढे असतं. किंबहुना, इतरत्र म्हटल्याप्रमाणे युद्धनीतीच्या दृष्टीने कालबाह्य झालेली तंत्रंच पुढील दोन-चार वर्षांमध्ये झिरपून सामान्यांच्या वापरात येतात. ड्रोन (चालकरहित दूरनियंत्रित विमान) हे याचं आदर्श उदाहरण आहे. गेल्या दशकात धोक्याच्या ठिकाणी मारा करण्यासाठी वापरली जाणारी ड्रोन्स आता चक्क पिझ्झा आणि पुस्तकं पोचवताना दिसतात. असो.

नवतंत्रज्ञानाचा आविष्कार दाखवणारी युद्धं जगात अनेक राष्ट्रांमध्ये अलिकडेच घडली आहेत. सातत्याने युद्धग्रस्त असलेला प्रदेश म्हणजे इस्त्राइल-पॅलेस्टाईन असं म्हणायला हरकत नाही. शेतीपासून पर्यटनापर्यंत अनेक क्षेत्रांमधली इस्त्रायलची तांत्रिक झेप आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे इस्त्रायलचं लष्कर आणि गुप्तचर संघटना (मोसाद) याला अपवाद असू शकतच नाही. काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो-रेप्टाइल) तयार करून शत्रुप्रदेशात सोडले होते. असा साप खर्‍या सापांसारखाच दिसतो. त्याचं डोकं म्हणजे कॅमेरा असतो. तो लष्करी किंवा इतर महत्त्वाच्या स्थानांभोवती फिरून, तिथले फोटो लगेच प्रक्षेपित करतो आणि गवतातून वा कुंपणाच्या कडेकडेने सरपटत परत येतो. इस्त्रायलने इलेक्ट्रॉनिक दूरनियंत्रित संगणकीकृत फुलपाखरंही तयार केली आहेत. पॅलेस्टाइनमधील हमास चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गाझा किनारपट्टीवर भिरभिरणारी अशी फुलपाखरं पकडल्याचा दावा केला आहे. कबुतरांच्या अंगावर छोटा कॅमेरा बसवून अद्यापही हेरगिरी केली जातेच परंतु त्यापेक्षा हे फुलपाखरू अधिक प्रभावी आहे. आकाराने छोट्या पक्ष्यापेक्षाही लहान असल्याने ते चक्क खोलीच्या खिडकीतून आत जाऊन टेहळणी करून दोन-चार सेकंदांमध्ये बाहेरही येऊ शकतं. यामध्ये जीपीएस वगैरे यंत्रणा बसवलेली असतेच शिवाय चेहरा ओळखणारं (फेस रेकग्निशन) सॉफ्टवेअरही असावं, असा अंदाज आहे कारण हमासने पकडलेल्या फुलपाखरात बेपत्ता तसेच युद्धकैदी इस्त्रायली सैनिकांची छायाचित्रं आढळली…

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांमध्ये असं हे सायबर-युद्ध, विविध रूपांमध्ये, आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलं असलं तरी खरी शस्त्रं वापरून प्रत्यक्ष लढाया आणि चकमकी जगभर चालू आहेत. त्यांच्यात खंड तर नाहीच उलट इलेक्ट्रॉनिक, संगणकीय आणि उपग्रहीय यंत्रणा वापरून (आतापर्यंत साधारणतः यांत्रिक पद्धतीने चालणार्‍या) पारंपारिक शस्त्रांना अत्यंत अचूक आणि कार्यक्षम बनवलं जात आहे. यामध्ये विमानवाहू नौकांपासून रणगाड्यांपर्यंत सर्वच उपकरणांचा समावेश असला तरी आपण फक्त वैयक्तिकरीत्या, हाताने चालवण्याच्या, अशा काही शस्त्रांकडे (हॅँडहेल्ड वेपन्स) नजर टाकू.

युद्धसज्जतेवर भरपूर खर्च करणार्‍या जगातल्या निवडक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अर्थातच अमेरिका. काही वर्षांपुर्वी अमेरिकेचं फक्त लष्करी विभागांसाठीचं अंदाजपत्रक एक हजार दशअब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होतं. ही रक्कम काही श्रीमंत देशांच्याही वार्षिक सकल उत्पन्नापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. या खर्चाचा बराचसा भाग अमेरिकेने जगभर तैनात केलेल्या सैनिकांवर खर्च होतो आणि अगदी कमी हिस्सा (तोदेखील दोन-चार दशअब्ज आहे) नवीन शस्त्रं विकसित करण्यासाठी वापरला जातो. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे लष्करावर मोठा खर्च करणार्‍या निवडक देशांमध्ये जर्मनी, रशिया, यूके, फ्रान्स, चीन इत्यादींसोबत आपणही आहोत. बहुतेकांनी जेम्स बॉँडचा ‘स्कायफॉल’ हा चित्रपट पाहिला असेल. त्यामध्ये ‘क्यू’ ने त्याला दिलेलं रिव्हॉल्व्हर अशा प्रकारचं होतं. शत्रुपक्षाने ते बॉँडवरच रोखलं तर त्यातून गोळी सुटत नाही कारण खुद्द बॉँडच्या फिंगरप्रिंट्स उर्फ हस्तरेषा पडताळल्याखेरीज ते सुरूच होत नाही. हे रिव्हॉल्व्हर त्याहीपुढे जातं. याला ‘फिंगरप्रिंट ऑथोराझेशन’ आहेच शिवाय हे हाताळणारी अधिकृत व्यक्ती आपल्या मनगटी घड्याळामार्फतही त्याचं नियंत्रण करू शकते.

यासाठी घड्याळाबरोबरच रिव्हॉल्व्हरमध्येही अत्यंत गुंतागुंतीची संगणकीय विश्लेषक यंत्रणा बसवण्यात आली आहे. घड्याळाकडून मिळालेल्या संदेशांनुसार हे हत्यार लॉक (लाल दिवा) किंवा अनलॉक (हिरवा दिवा) होतं. सेमी-ऑटोमॅटिक प्रकारचा हा लॉँचर 40 मिमी व्यासाचे सहा ग्रेनेड (बॉँब) सहा सेकंदांमध्ये सोडू शकतो (मिनिटाला 18). एवढंच नाही, तर यामधून पॅराशूट जोडलेले खास प्रकारचे ग्रेनेडही हवेत सोडता येतात. हा ग्रेनेड शत्रुप्रदेशात 300 मीटर उंचीवर (आणि बराच लांबपर्यंत) जातो. तिथे त्यामधलं पॅराशूट उघडतं आणि जमिनीवर पडून स्फोट होईस्तोवर त्यामधला व्हीडिओ कॅमेरा शत्रुप्रदेशाचं चित्रण करून लॉँचरवरील स्क्रीनकडे तसंच मागील फळीतल्या संगणकीकृत नियंत्रण कक्षाला थेट (रिअल टाइम) पाठवतो. यामुळे सैनिकांनी कुठे मारा करावा हे अचूकपणे ठरवता येतं. या माहितीचं विश्लेषण झालं की लगेचच या लॉँचरमधून हेलहाउंड प्रकारचा ग्रेनेड झाडला जातो. याच्या जबरदस्त स्फोटानंतर त्या जागी काहीही शिल्लक रहात नाही आणि ‘सीक अँड डिस्ट्रॉय’ (शोधा आणि नष्ट करा) या लष्करी शब्दप्रयोगाचं पुरेपूर प्रत्यंतर दिलं जातं. यांचा वापर अमेरिकेने इराकमध्ये केल्याचं सांगतात.

या ग्रेनेड लॉँचरचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. यातून 25 मिमीची चार शेल्स तब्बल अर्धा मैल अंतरापर्यंत झाडता येतात. एवढंच नाही तर, त्यांचा स्फोट केव्हा होईल हे आधीच ठरवता येतं. म्हणजे असं की पहिल्या ग्रेनेडने खोलीची भिंत पाडली की त्यानंतरच्या शेल्सना त्यात सहज प्रवेश मिळतो आणि नंतर काही सेकंदानी त्यांचा स्फोट घडवता येतो; ज्यायोगे संपूर्ण नुकसान साधता येतं. ‘इंडिपेंडन्स डे’ या चित्रपटातीली शेवटची काही मिनिटं आठवत असणार्यांना उशिराने घडवलेल्या स्फोटाचं महत्त्व बरोब्बर कळेल. याशिवाय या लॉँचरमध्ये विविध एमिंग साइट्स, लेझर्स आणि सेन्सर्स समाविष्ट आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये एक्सएम 25 चा वापर केला आहे. एफएमजी म्हणजे फोल्डिंग मशिन गन. संपूर्ण घडी घातली की ती हुबेहूब लॅपटॉपच्या बॅटरीसारखी दिसते.

अमेरिकन गुप्तहेर खात्यांसाठी खास बनवलेली ही मशिनगन 9 मिलीमिटरच्या 30 गोळ्यांची क्लिप अल्पावधीतच झाडू शकते. इतकी छोटी असूनही तिच्यावर ऑटो-सिअर (ट्रिगरवरचा दाब योग्य असल्याची खात्री करणारं उपकरण) आणि टॅक्टिकल लाइट बसवता येतो. ही एफएमजी कोट किंवा पॅँटच्या खिशात मावते! युद्ध आता कुरुक्षेत्रापुरतं मर्यादित न राहता अक्षरशः आपल्या घरापर्यंत येऊ शकतं हे आपण पाहतोच आहोत. दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये तसंच खेड्यांमधल्या अरुंद गल्लीबोळात गोळीबार होत असल्याच्या अनेक घटना टीव्हीवरील बातम्यांमध्ये रोज दाखवल्या जातात. युद्धाचं हे बदलतं स्वरूप शस्त्रांच्या निर्मात्यांनीही लक्षात घेतले आहे. मेटॅडोर रॉकेट लॉँचर हे याचं एक नवीनतम उदाहरण म्हणता येईल. ‘भिंती पाडणं’ हा एकच मूळ हेतू साधण्यासाठी याची रचना केली गेली आहे! आटोपशीर आकाराचा असल्याने हा लॉँचर अडचणीच्या जागेतही सफाईने हाताळता येतो. शिवाय यामधून रॉकेट सोडल्यानंतर वापरणार्याला फारसा प्रतिघात (रीकॉइल) उर्फ दणका बसत नाही. वरील एमएक्स 25 प्रमाणेच यामधून सोडलेल्या रॉकेटच्या स्फोटाची वेळ ठरवता येते आणि दुसर्या वा तिसर्या रॉकेटचा स्फोट विलंबाने घडवून आणता येतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या