Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मतदान करतानाचे फोटो काढणे पडले महागात; आचासंहिता भंगाचे तीन गुन्हे

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, अचार संहिता भंगाचे विविध ठिकाणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

यामध्ये कळवण व सटाणा येथे मतदान झाल्यानंतर काही युवकांनी मतदान करतानाच्या सेल्फी, फोटो सोशल ग्रुपवर व्हायरल केले होते. ही बाबत निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ सबंधितांना ताब्यात घेऊन फोटो काढुन टाकले.

तर वडनेर खाकुर्डी येथील मतदान केंद्राच्या आवारात शिवसेनेचा कार्यकर्ता गळ्यात पक्षचिन्हांचे मफलर व हातात माहिती पत्रके घेऊन मतदारांना आव्हान करताना आढळुन आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

तीनही प्रकरणी सबंधीत पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ग्रामिण पोलीस दल प्रशासनाने स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!