Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महिलेला बेडरूममध्ये डांबून ठेवल्याने गुन्हा

Share

नाशिक (प्रतिनिधी) :- मागील भांडणाचा राग मनात ठेवून दोघांनी महिलेला घरात बंद करून मारहाण करीत बेडरूमला बाहेरून कडी लावून बाहेर जाण्यास गैरपरिरोध केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको परिसरातील उत्तमनगर येथे राहणार्‍या महिलेला ज्ञानेश्वर सानप (रा. सर्वेश्वर चौक, गणपती मंदिराच्या बाजूला, उत्तमनगर), ठकूबाई बाळकृष्ण सानप व बाळकृष्ण नामदेव सानप या तिघांनी सदर महिलेला मागील भांडणाची कुरापत काढून संशयित ठकूबाई सानप व बाळकृष्ण सानप या दोघांनी घरात घुसून तिला मारहाण केली.

तिच्या बेडरूमची बाहेरून कडी लावून घेतली. महिलेला बाहेर जाण्यास गैरपरिरोध केल्याप्रकरणी अंबड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!