Type to search

सिन्नरफाटा : …अखेर दंडुका मारणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नरफाटा : …अखेर दंडुका मारणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

हेल्मेट तपासणी मोहिमेत युवकाच्या डोक्यात दंडुका मारणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर फाटा येथे गेल्या आठवड्यात हेल्मेट तपासणी मोहीम सुरू असताना दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात पोलिसांनी दंडुका हाणल्याची घटना घडली होती. तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर आडगाव येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटना घडल्यानंतर जखमी शुभम महाले याचा भाऊ ओंकार याने  पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार तब्बल अकरा दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

दंडुका मारणाऱ्या पोलिसाचे नाव रवींद्र खोडे असून त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाच्या नातेवाईकांनी या घटनेची दखल कोन्हीही न घेतल्याने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान ही बाब पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कानावर गेल्यानंतर चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पाटील यांनी शुभमची भेट घेऊन चौकशी केली होती.  तसेच शुभमच्या कुटुंबियांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!