Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राड्याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात १७ पुरोहीतांविरोधात गुन्हा दाखल

Share

नाशिक  | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक पुरोहित आणि बहुउद्देशीय पुरोहित संघटना यांच्यात झालेल्या हाणामारीनंतर रात्री उशीर त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्थानिक पुरोहित आणि बहुउद्देशीय पुरोहित यांच्यात नारायण नागबली पूजा करण्यावरून वादंग निर्माण झाले होते. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात बहुद्देशीय पुरोहित संघटनेच्या पुजाऱ्यांनी मारहाण केली होती.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार कुणालाही कुठेही व्यवसाय करण्याचा अधिकार असून त्र्यंबकमध्ये स्थानिक पुरोहितांची हुकुमशाही चालू देणार नसल्याचे पुरोहित संघटनेच्या पुजाऱ्यांनी सांगितले होते.

दुपारीच त्र्यंबक पोलिसांत बहुउद्देशीय ब्राह्मण संघटना पदाधिकारी अनिल कुलकर्णी आणि त्यांच्या साथीदारांनी तक्रार दाखल केली होती.  मात्र, दाबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार घेतली जात नसल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान, माध्यमांत वृत्त झळकल्यानंतर रात्री उशिराने स्थानिक पुरोहितांच्या विरोधात १७ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम १८६० नुसार १४३, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!