नाशकात जळीत कांड सुरूच; कॅनल रोड परिसरात रात्री दोन दुचाकी जाळल्या

0
नाशिकरोड | कॅनल रोड आम्रपाली झोपडपट्टी परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून दोन दुचाकी जाळण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

सातपूर, नवीन नाशिक, पंचवटी परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सातपूरमधील दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरात दुचाकी जळीत कांडाने डोके वर काढले आहे. शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांची गस्त असूनदेखील अनेक भागात गुन्ह्यांचा आलेख वाढताना दिसून येतो आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक भागात भीतीचे वातावरण आहे.

नाशिक पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारी कमी करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*