मराठी बिग बॉस : राजेश, रेशमच्या अश्लील वर्तनाविरोधात नाशकात तक्रार दाखल

0
नाशिक | सलमान खानच्या हिंदी बिग बॉसच्या धर्तीवर कलर्स मराठी वाहिनीवर मराठी बिग बॉस कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या शो चे होस्टिंग मराठी अभिनेते महेश मांजरेकर करीत आहेत. मराठी बिग बॉसमधील रिअॅलिटी शोमध्ये अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री रेशन टिपणीस हे अश्लील वर्तन करत असून त्यांच्या गैरवर्तनाचे काही फोटो सादर करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी तक्रार नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ऋषिकेश बळवंत देशमुख (रा. रामवाडी, पंचवटी) दिलेल्या तक्रारीनुसार रेशम आणि राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, मराठी बिग बॉसदरम्यान राजेश आणि रेशन यांच्या अश्लील संवाद होऊन थेट बेडसीन देण्यापर्यंत अनेक अश्लील संवाद आहेत. यात अनेक संवाद आक्षेपार्ह भाषेत आहेत.

विशेष म्हणजे, राजेश आणि रेशम विवाहित असून त्यांच्यामागे कुटुंबदेखील आहे. असे असूनदेखील विवाहबाह्य संबंधांना ते या शो च्या माध्यमातून खतपाणी घालताना दिसून येतात. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*