Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घरपट्टी थकल्याने दिंडोरीत कंपनीला ठोकले टाळे

Share

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने भगतारा ज्पुट प्रा.लि. (सुतळी कंपनी) या कंपनीला थकबाकीची पूर्व नोटीस देवूनही घरपट्टीची थकीत रक्कम न भरल्याने मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीला टाळे ठोकण्यात आले.

ही कारवाई प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशांत पोतदार, लेखा अधिकारी अमोल मवाळ, आरोग्य अधिकारी तानाजी निकम,  कर अधिकारी राजेंद्र खिरकाडे, पाणी पुरवठा अधिकारी हर्षल बोरस्ते, रामदास चारोस्कर, आनंदा खराटे, विद्युत वायरमन चिंतामण वाघ, शिपाई बाळासाहेब निसाळ आदींसह स्वच्छता,आरोग्य, पाणी पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने कारवाई केली,

कंपनीच्या मुख्य गेटला अधिकाऱ्यांनी सील केले असून घरपट्टी भरण्याच्या सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच घरपट्टी इतर नागरिक किंवा व्यावसायिकांनी थकवली तर अशाच प्रकारची कारवाई केली जाईल अशी तंबीही मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!