Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कंपनीकडून 53 लाखाची फसवणूक

Share
‘अर्बन’बँक घोटाळाप्रकरणी खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका, Latest News Arban Bank Froud petition Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- मॅक्सस्केर क्युरिज इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक करणार्‍याची तब्बल 53 लाख 40 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय-50 रा. वाकोडी फाटा ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीशी संबंधीत असलेले सचिन कारभारी साळुंके (रा. प्रेमदान चौक) व युवराज सोपान रणसिंगे (रा. शेरगाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॅक्सस्केर क्युरिज इंडिया कंपनीचे कार्यालय प्रेमदान चौकातील डौले हॉस्पिटल शेजारी होते. या कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते. या कंपनीत फिर्यादी गवळी यांनी 25 लाख रुपये भरले होते. मोहन नाथा दुसुंग े(रा. नेहरू चौक, भिंगार) यांनी 5 लाख, किशोरकुमार रामपाल प्रजापती (रा.भिस्तबाग चौक) यांनी 8 लाख 90 हजार रूपये, अनिल श्रीमल पितळे (रा.नवी पेठ) यांनी 7 लाख रूपये, रामचंद्र दशरथ बोडवे(रा. भिंगार) यांनी 7 लाख 50 हजार रूपये गुंतवणूकीच्या माध्यमातून भरले होते. मात्र, संबंधीत कंपनीने गुंतवणूक करणार्‍याला व्याजरूपात कोणताही मोबदला न देता तब्बल 53 लाख 40 हजाराची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे हे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!