Thursday, May 2, 2024
Homeनाशिककंपन्यांच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कंपन्यांच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील आलमायटिक केमिकल्स कंपनी, पूजा केमिकल्स कंपनी, आरावली केमिकल्स कंपनी, न्यू बॉम्बे कंपनी, डेड्स ऑईल प्रायवेट लिमिटेड, रोलिंग मिल, शिवसागर, के.के.स्टिल, अलरब केमिकल्स आदी कंपन्यांच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, जनावरांचे आरोग्य व शेतीचे भवितव्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

या परिसरातील कंपन्या पावसाळ्यात दुषित पाणी वाहत्या पाण्यात सोडतात. त्यामुळे ते दुषित पाणी हे आजूबाजूच्या शेतीमध्ये वाहुन जाते. ते पाणी शेतीमध्ये मिसळून विहीरीमध्ये दुषित पाणी उतरत आहे.

विहीरीचे पाणी काळसर रंगाचे होते. या पाण्याची तपासणी केली असता हे पाणी पिण्यायोग्य नाही आणि शेतीसाठी उपयोग नाही. त्याचप्रमाणे या परिसरात डेड्स, ऑईल प्रा. लिमिटेड ही कंपनी असून या कंपन्यामध्ये जुने टायर्स जाळून विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते.

ही कंपनी चालू असताना हवेमध्ये वैशिष्ट प्रकारचा दुर्गंध पसरतो. त्यामुळे वृध्द,लहान मुले, गरोदर माता यांनाही त्रास होतो. छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, उलटी होणे, श्‍वास घेणे त्रास होणे आदी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे योग्य ती चौकशी करुन लवकरात लवकर बंद करण्यात याव्या व परिसरातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शामराव बोलकर, संदिप पवार, साहेबराव पवार, भाऊसाहेब पवार, दिपक जाधव, बबन जाधव, हरीभाऊ जाधव, लक्ष्मीकांत जाधव, अशोकराव जाधव, संपत पवार, दिनकर पवार, रमेश ठाकूर, शंकर पवार, राहुल जाधव, खंडू मटाले, सागर जाधव, राहुल गायकवाड, रामभाऊ कक्राळे, रावसाहेब कक्राळे, हिरामण कक्राळे, बबन पवार, विष्णू कक्राळे, विक्रम लोखंडे, अरुण मटाले, संतोष पवार, हिमेश पवार आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या