Friday, May 3, 2024
Homeनाशिकसंत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी समितीची मागणी

संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी समितीची मागणी

नाशिक । Nashik

आषाढी वारीसाठी दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या निवृत्तीनाथ मंदिर समिती अस्तित्वात नसल्याने सोहळा संयोजनासाठी तातडीने समितीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता संदिप शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबतचे निवेदन त्यांनी सहायक धर्मादाय आयुक्तांना दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे आषाढीवारीसाठी त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूर असा संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा जुन अखेरीस निघणार आहे. परंतु संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर येथील समिती घटनेप्रमाणे संपुष्टात आली असून सध्या मंदिराचे कामकाज शासकीय प्रशासक पाहत आहेत.

यामुळे या सोहळ्याचे नियोजन, संयोजन, तयारी यासाठी अनुभवी वारकरी काही अनुभवी विश्वस्तांची सोहळा कालावधीसाठी समिती स्थापन करण्याची गरज आहे. अन्यथा पालखी सोहळ्याचे नियम व नियमन यात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे यंदाही पालखी सोहळा शासकीय निमांनुसार होणार असला तरी त्यात पालखी सोहळ्याचे नियम व परंपरा पाळणे बंधनकारक असते. यामुळे यात अनुभवी वारकरी, विश्वस्थ, भक्त व महिला तसेच इतर भाविक अशा सवार्ंची समिती गठीत करण्या यावी. तसेच सोहळ्यासाठी किमान 100 जणांना परवानगी देण्यात यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या