Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

30 जूनपर्यंत कॉमर्सच्या निकालाचा फैसला

Share

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांना विद्यापीठाने एम-लॉ विषयात नापास केले आहे. मात्र, विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने एम-लॉ विषयाच्या सर्व उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकीत करून 30 तारखेपर्यंत निकाल लावला जाईल, असा निर्णय घेतला आहे.

वाणिज्य शाखेच्या निकालात बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क (एम लॉ) विषयात 48 ते 52 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. या विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जावे व निकाल पुन्हा एकदा लावला जावा, अशी मागणी विविध विद्यार्थी प्रतिनिधी व संघटनांनी केली होती.

याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. बुधवारी विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक होऊन गांभीर्याने चर्चा करण्यात आली.

दरम्यान, पीएच.डीसाठी विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या ‘पेट’ परीक्षेस अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्याची तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. या मागणीवरही 30 तारखेपर्यंत निर्णय घेऊन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस पात्र ठरवण्यात येईल व पूर्वपरीक्षेच्या अर्जाची मुदत वाढवून देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठाने याविषयी विद्यार्थीहिताचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे नुकसान टळणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विजय सोनवणे यांनी विद्यापीठ व विद्यार्थ्यांमधील हा तिढा सोडवण्यासाठी विशेष पाठपुरावा केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!