कपिल शर्मावर भडकले शत्रुघ्न सिन्हा

0
मुंबई: कॉमेडियन कपिल शर्मा सध्या कामातून ब्रेक घेऊन डिप्रेशनवर उपचार घेत आहे. याच कारणांमुळे तो सध्या सोशल मीडियापासून दूर आहे. एकेकाळी कपिल शर्माच्या मिमिक्रीमुळे अनेक लोक हसत होते. परंतू अनेक सेलेब्स कपिलच्या मिमिक्रीमुळे नाराजही होत होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपुर्वी त्यांची कपिल शर्मावरील नाराजी व्यक्त केली. सिन्हा म्हणाले की, मिमिक्री ही स्टेजपर्यंतच योग्य वाटते, ती रस्त्यावर किंवा संसदेपर्यंत आणू नये.”
एका मुलाखती दरम्यान शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “मिमिक्री मर्यादेत राहून केली तर काहीच हरकत नाही, परंतू कपिलने त्याच्या शोमध्ये सर्व लिमिट क्रॉस करुन माझी खिल्ली उडवली होती. माझी मुलगी सोनाक्षी सिन्हा त्याला अनेक वेळा म्हणाली की, असे करु नको. परंतू तरीही त्याने ऐकले नाही.” कपिल शर्मा आपल्या शोमध्ये भोजपुरी KBC ला शत्रुघ्न सिन्हा बनून होस्ट करायचा. यामध्ये तो शत्रुघ्न सिन्हाची मिमिक्री करायचा आणि आलेल्या पाहूण्यांना कंटेस्टंट बनवायचा.

LEAVE A REPLY

*