Type to search

विनोदी अभिनेता अली यांचा राजकारणात प्रवेश

मुख्य बातम्या हिट-चाट

विनोदी अभिनेता अली यांचा राजकारणात प्रवेश

Share
हैदराबाद : अभिनयाकडून राजकीय विश्वात पदार्पण करणाऱ्या कलाकारांमध्ये आता आणखी एका प्रसिद्ध चेहऱ्याची भर पडली आहे. तो चेहऱा आहे विनोदी अभिनेता अली याचा. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तेलुगू चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकार म्हणून नावारुपास आलेल्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेता अली यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत अली यांनी सोमवारी पक्षप्रवेश केला. येत्या लोकलभा निव़डणूकांच्या रिगणात ते उतरणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.

खुद्द अली यांनीच राजकारणात असणाऱ्या त्यांच्या स्वारस्याविषयी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याविषयी जगनमोहन रेड्डी यांना सांगितलं होतं. ज्यानंतर त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुळच्या आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथील असणाऱ्या अली यांनी राजकारणात प्रवेश केला. वायएसआर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहिती देण्यात आली.

आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्‍ये लोकसभेच्‍या निवडणुका एकाच टप्‍प्‍यात होणार आहेत. दोन्‍ही राज्यांमध्‍ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान ११ एप्रिलला होणार आहे. ज्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार असून उमेदवारांच्या हाती मतदारांनी दिलेल्या निकाल येणार आहे.

कॉमेडियन अली यांची ओळख केवळ दक्षिण भारतापर्यंतच नाही तर उत्तर भारतातही आहे. अली यांनी अनेक हिंदी डब चित्रपटात काम केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!