Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

‘पप्पा परत या…!’ वडिलांच्या निधनानंतर चौथीच्या मुलाचा निबंध आणतोय डोळ्यात पाणी

Share

पप्पा परत या..!

वडिलांच्या निधनानंतर मुलाची निबंधातून आर्त हाक, दिली आहे. चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाने तोडक्या मोडक्या अक्षरात घरातली सत्य परिस्थिती मांडून वडिलांना परत या अशी आर्त हाक दिली आहे.

लहान जखम झाली तर आपल्या तोंडातून आई गं पटकन बाहेर पडते, पण मोठ काही संकट कोसळलं किंवा उभं ठाकल की बापाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

या मुलाच्या घरी अठराविश्व दारिद्र्य, चौथ्या इयत्तेतील चिमुकल्या मंगेश वाळकेचे वडील आजारपणात मृत्यू पावले आहेत.  मंगेशने लिहिलेले पत्र वाचल्यानंतर वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.

मंगेशने लिहिलेल्या निबंधात कुटुंबाची आर्थिक विवंचना आणि घरातला कर्ता पुरुष नसलेली रुखरुख स्पष्टपणे जाणवते. एवढेच नाही तर ‘पप्पा तुम्ही परत या’ असे भावनिक वाक्य लिहून मंगेशने त्या पत्राचा शेवट केला आहे. बाप हयात नसलेल्या पोराने बापावर लिहिलेल्या निबंधाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

मंगेश हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतो. त्याने ‘माझे पप्पा’ या विषयावर निबंध लिहिला आणि त्याच्या कोवळ्या मनाच्या वेदना आणि नितळ भावना कागदावर उमटल्या.

ते वाचून त्याच्या शिक्षिका नजमा मैनुद्दीन शेख या भावनिक झाल्या. त्यांनी ओल्या डोळ्यांनी मंगेशच्या पत्रास आपल्या बारावीच्या वर्गमित्राच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर केले. मंगेशने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुलाच्या निरागस फोटोसह हे पत्र सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!