Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ‘सेना विमानन कोर’ला ‘प्रेसिडेंट कलर’ पुरस्कार; दिमाखदार सोहळा बघा लाईव्ह

Share

नाशिक । प्रतिनिधी 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅटस्) ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गांधीनगरच्या कॅटस् मैदानावर मुख्य सोेहळा पार पडला.

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रूपस् यांच्या माध्यामतून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘सेना विमानन कोर’ला ‘प्रेसिडेंट कलर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महानिर्देशक कर्नल कमांडंट ले. जनरल कवलकुमार (अतिविशिष्ट सेवा मेडल) उपस्थित होते. यावेळी होणार्‍या पथसंचलनाचे नेतृत्व सेना विमानन कोर प्रशिक्षण स्कूलचे ब्रिगेडियर सरबजितसिंग बावा भल्ला यांनी केले.

सियाचीनसारख्या दुर्गम आणि बर्फाळ भागासोबतच कच्छच्या रणक्षेत्रातही या दलाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचादेखील सन्मान यावेळी करण्यात आला.

त्यानंतर स्कूल ऑफ आर्टिलरी येथे ‘रूद्रनाद’ या आर्टिलरी म्युझियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  स्कूल ऑफ आर्टिलरीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २ बाय ५ फुटाची भव्य ‘सेन्टेनरी ट्रॉफी’देखील प्रदान केली जाणार आहे. यावेळी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार आहे. आर्टिलरीच्या माध्यमातून त्यांना ते भेटही दिले जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!